GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात पुण्यातील आयटी अभियंत्याची आत्महत्या

Gramin Varta
330 Views

चिपळूण : शहरातील पागमळा भागात असलेल्या एकता अपार्टमेंटमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या एका आयटी अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत आशिष किरण शेडगे (वय ४०, मूळ रा. आकुर्डी, पुणे) यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आशिष शेडगे हे पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी चिपळूण येथे नोकरी करत असून कुटुंबासह ते येथे वास्तव्यास होते.
बुधवारी रात्री आशिष शेडगे घरी आल्यानंतर मद्यसेवन केल्याची माहिती आहे. त्यानंतर पत्नी व मुले जेवण करून झोपी गेली असताना रात्री उशिरा त्यांनी गळफास घेतल्याचे सकाळी निदर्शनास आले. पत्नीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत फासाची दोरी कापली; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3386923
Share This Article