GRAMIN SEARCH BANNER

आजपासून आधार कार्डशी संबंधित 5 नवीन नियम लागू होणार

Gramin Varta
788 Views

दिल्ली: आधार कार्डवर 12 आकडी एक नंबर असतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आधार कार्ड बनवणे गरजेचे आहे. अलिकडेच आधार कार्डसंदर्भातील पाच नवीन नियम जारी केले आहेत. जे 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहेत.

जुने कार्ड अपडेट करण्यापासून ते नवीन कार्डवरुन वडील व पतीचे नाव हटवण्यापासून असे अनेक बदल आहेत. अशातच तुम्ही जर आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत करुन घ्या. कारण या बदलांमुळे केवळ अपडेट प्रक्रिया आणि शुल्कावर परिणाम होणार नाही, तर तुमच्या आधार कार्डवर दाखवण्यात येणाऱ्या काही माहितीतही बदल होईल.

आधार अपडेटसाठी शुल्क

1 ऑक्टोबर 2025पासून आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्तासारख्या सामान्य सुधारणेसाठी 75 रुपयांचे शुल्क लागणार आहे. तुम्ही जर बायोमेट्रिक माहिती, जसं की फिंगरप्रिंट, फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी 125 रुपये द्यावे लागतील. मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता 125 रुपये शुल्क द्यावे लागेल. पण नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही ते पूर्णपणे फ्री असणार आहे.

लहान मुलं आणि किशोरवयीनांसाठी बायोमेट्रिक अपडेट

एक चांगली बातमी म्हणजे 5 ते 7 वयोगटातील मुलांना आणि 15 ते 17 वयोगटातील किशोरांना बायोमेट्रिक अपडेटसाठी आता शुल्क भरावे लागणार नाही. पूर्वीचे शुल्क 50 रुपये होते, परंतु आता ते माफ करण्यात आले आहे. तथापि, या वयोगटांसाठी बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहेत. वेळेवर ते न केल्यास त्यांचे आधार कार्ड अवैध ठरू शकते.

पति किंवा पतीचे नाव

15 ऑगस्ट 2025 पासून नवीन आधार कार्डवर 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकाच्या आधार कार्डवर वडिल किंवा पतीचे नाव आता दिसणार नाही. ही माहिती फक्त UIDAI च्या रेकॉर्डसाठी असेल. या बदलामुळं सतत नाव बदलण्याची गरज नसेल तसंच, लोकांची प्रायव्हसीदेखील सुरक्षित राहिल. महिलांसाठी हे एक मोठं पाऊल आहे.

जन्मतारखेत बदल

आता तुमच्या आधार कार्डवर जन्मतिथी फक्त वर्षाच्या स्वरुपातच दिसणार आहे. सुरुवातील पूर्ण जन्मतारिख 01/01/1990 UIDAIच्या रेकॉर्डमध्ये राहणार आहे. आता तुमच्या आधार कार्डवर फक्त नाव, वय आणि पत्ताच दिसणार आहे.

पत्ता बदलण्यासाठी नवीन दस्तावेज

1 ऑक्टोबर 2025पासून सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे. याचा अर्थ तुम्ही UIDAIच्या वेबसाइट (uidai.gov.in) किंवा mAadhaar अॅपवर रिक्वेस्ट सबमिट करुन जवळच्या आधार केंद्रावर आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करु शकता. त्यानंतर अपडेट
ऑनलाइन होणार आहे.

Total Visitor Counter

2646712
Share This Article