GRAMIN SEARCH BANNER

मुंबईत मराठा आंदोलनाला गालबोट; सीएसएमटी परिसरात आत्महत्येचा प्रयत्न

Gramin Varta
21 Views

मुंबई: मुंबईत काल सकाळपासून मराठा आंदोलकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून मंत्रालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर भगव्या झेंड्यांनी गजबजून गेला आहे.

काल सकाळपासून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आंदोलनाचा जोर वाढत चालला आहे. मात्र या आंदोलनादरम्यान सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठा गोंधळ उडाला. एका मराठा तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या तरुणाला थांबवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदान चिखलमय झाले आहे. पाणी साचल्याने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. पावसापासून बचावासाठी आंदोलक विविध ठिकाणी आसरा घेत होते. आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर मराठा आंदोलकांनी सीएसएमटी, चर्चगेट परिसर गाठला असून तिथेही मोठी गर्दी झाली होती. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदान चिखलमय झाले होता. पाणी साचल्याने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर मराठा आंदोलकांनी सीएसएमटी, चर्चगेट परिसर गाठला असून तिथेही मोठी गर्दी झाली होती.

सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांनी हलगीच्या तालावर जल्लोष केला. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणाबाजीत परिसर दुमदुमला. आंदोलकांनी सेल्फी आणि व्हिडिओ काढत एकजुटीचा संदेश दिले.

Total Visitor Counter

3224956
Share This Article