GRAMIN SEARCH BANNER

महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धेला चिपळूणात सुरवात

Gramin Varta
75 Views

पहिल्या दिवशी दोन नाटक सादर, नाट्यप्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चिपळूण : राज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनी अंतर्गत आयोजित आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेचे आज चिपळूण येथे उदघाटन झाले. उद्घाटनानंतर कोयना जलविद्युत केंद्रातर्फे सकाळच्या सत्रात ‘कार्टी नंबर वन’ हे तुफान विनोदी तसेच संध्याकाळच्या सत्रात पारस औष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘बातमीची गोष्ट’ हे सामाजिक विषय घेऊन नाटक सादर झाले. दोन्ही नाटकांना नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही नाट्य स्पर्धा सुरू आहे. पुढील पाच दिवस वेगवगळे नाटक सादर केले जाणार आहेत. दररोज दोन नाटक सादर केले जातील. आज सकाळी उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख्य अतिथी म्हणून मुंबई येथील महानिर्मितीचे नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता प्रफुल्ल कुटेमाटे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोयना वीज संकुलनाचे मुख्य अभियंता संजय चोपडे, कोयना वीज केंद्रातील अधीक्षक अभियंता संतोष चव्हाण, एम.सी.गायवाड, रोहीदास आव्हाड, कल्याण अधिकारी प्रसाद निकम उपस्थित होते. पंचवीस वर्षानंतर या नाट्य स्पर्धा कोकणात होत असल्यामुळे कोकणातील चिपळूण शहरात होत असल्यामुळे कोकणचे विशेष असे ‘कोकणी गाऱ्हाणे’ घालून नाट्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्याआधी प्रमुख अतिथींचे तुतारी, ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये महाराष्ट्रातून वीज निर्मितीच्या विविध केंद्रातून आलेल्या नाट्यकर्मींना संबोधित करताना वीज निर्मितीसारख्या अत्यावश्यक सेवेत काम करत असतानाही आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि दैनंदिन कामकाजातून थोडासा वेळ काढून विरंगुळा मिळावा तसेच कर्मचाऱ्यांतील संघभावना वाढीस लागून स्वत:सोबतच कंपनीचीही प्रगती व्हावी, असा नाट्यस्पर्धा आयोजनाचा उद्देश असल्याचे सांगितले. पाच दिवस चालणाऱ्या या नाट्यस्पर्धेतील दहा नाटकांमध्ये विविध सामाजिक विषय तसेच धमाल विनोदी नाटकं सादर केली जाणार आहेत.

Total Visitor Counter

3370564
Share This Article