GRAMIN SEARCH BANNER

‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहार शेख यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Gramin Varta
651 Views

ठाणे: मुंब्रा शहरातून एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहार युनूस शेख या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे चार नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो.

या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी ” कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले. त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहे. असे असतानाचा आता भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी या वक्तव्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस बजावली.

मुंब्रा हिरवा करुन टाकू असं सहार शेख म्हणाल्या होत्या, त्यावरुन नोटीस

मुंब्र्याला हिरवं करायचं आहे, अशा अशायाचं ते विधान होतं, आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्या अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वक्तव्याची दखल आम्ही घेतली आहे. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करु नका म्हणून बजावलं आहे. तसंच नोटीस बजावली आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंब्रा हिरवा करणार म्हणजे काय? याचा अर्थही उलगडला

संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू याचा अर्थ काय हे विचारलं असता सहार शेख म्हणाल्या, ‘माझ्या पक्षाचा पक्षाचा म्हणजेच एमआयएमचा झेंडा हिरवा आहे. त्यामुळे मुंब्रा हिरवा करायचा आहे असं वक्तव्य केलं. माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मुंब्रा भगवा करु असं मी म्हटलं असतं. इतकाच त्या विधानाचा अर्थ आहे.’ सहार शेखने म्हटलं आहे कैसा हराया… असं म्हणत तिने जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं.

कोण आहे सहार शेख?

१) सहार शेख या केवळ नवख्या नेत्या नाहीत, तर त्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत.

२) सहार शेख यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते.

३) सहार शेखचे वडील युनूस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे लेकीसाठी तिकिट मागितले होते.

४) तिकिट नाकारल्यानंतर सहर यांनी AIMIM पक्षाकडून निवडणूक लढवली.
सहर शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

५) सहार शेख यांचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सहारच्या विजयानंतर तिचे वडील युनुस शेख काय म्हणाले?

लेकीच्या दणदणीत विजयानंतर सहार शेखचे वडील युनूस शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना इशारा दिला आहे, आत्ताच वॉर्निंग देतोय इथून पुढे कोणाच्याही लेकीच्या भविष्यासोबत खेळू नका… नाही तर आमची जनता एकत्र होऊन कशी विकेट पाडते पाहिलं ना… हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा कोणत्याही धर्मची असो मुलगी ही मुलगी असते.

Total Visitor Counter

3072102
Share This Article