GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी

Gramin Varta
64 Views

चिपळूण : हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती चिपळूण शहर शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचनाका येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचे जयंती वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कार्यक्रमात विशेष जोश व उत्साह पाहायला मिळाला.

या प्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ व उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परिसरात “बाळासाहेब ठाकरे अमर रहे”, “आनंद दिघे साहेब की जय” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

दिवसभर या ठिकाणी विविध सामाजिक व संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, स्थायी समिती सदस्य उदय जुवळे, प्रमोद बुरटे, पाणी समिती सभापती निहार कोवळे, वैशाली निमकर, संदीप भिसे, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, अंजली कदम, महिला व बालकल्याण समिती सदस्य रसिका देवळेकर, बांधकाम समिती सभापती विक्रांत उर्फ कपिल शिर्के, निलम जाधव, शिवसेना गट नेते अंकुश आवले, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, गणेश आग्रे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती पल्लवी मोहन महाडिक यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक बाळ परांजपे, नगरसेवक विकी लवेकर, शितल रानडे, माजी नगरसेवक आशिष खातू, महंमद फकीर, महिला आघाडी शहर प्रमुख प्राजक्ता टकले, उदय गांधी, सुयोग चव्हाण, दयाजवळ, धीरज नलावडे, कानडे, पप्पू लहाने, माजी नगरसेवक करामत मिठागरी, संदेश किंजळकर आदींसह शिवसेना–भाजप युतीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3199525
Share This Article