GRAMIN SEARCH BANNER

दापोली: चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये  अपहार; महिला पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल

Gramin Varta
143 Views

दाभोळ: दापोली तालुक्यातील चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांच्या रकमेवर डल्ला मारून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन महिला शाखा डाकपाल सोनिया संदेश तेलप (वय २६, रा. मळे वरची वाडी, दापोली) यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२० मध्ये झालेल्या या आर्थिक अपहाराची माहिती समोर आल्यानंतर डाक विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत गुहागर येथील डाकघर निरीक्षक हिमांशु हरिश्चंद्र जोशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी सोनिया तेलप या ९ जुलै २०२० ते १७ ऑगस्ट २०२० या कालावधीत चिखलगाव येथे शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांनी पदाचा गैरवापर करत निलेश गोविंद घडवते, लक्ष्मी सखाराम शिगवण आणि सरिता गजानन कांबळे या तीन खातेदारांच्या खात्यातून एकूण ३६ हजार ६०० रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. या रकमेचा अपहार करून त्यांनी शासनाची व खातेदारांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3370372
Share This Article