GRAMIN SEARCH BANNER

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ जानेवारी रोजी चिपळुणात

Gramin Varta
168 Views

रत्नागिरी जिल्ह्यात घेणार एकमेव जाहीर सभा

चिपळूण: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 जानेवारी रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. युतीच्या शिलेदारांसाठी त्यांची बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही एकमेव जाहीर सभा असल्याने भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासह जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांनी सर्व ताकद पणाला लावली जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी शिवसेना भाजप युतीने जोमाने प्रचार सुरू ठेवला आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत मुख्यमंत्री देखील आता मैदानात उतरले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यात प्रत्येकी एक अशा दोन जाहीर सभा घेणार आहेत. यातील चिपळूणच्या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने स्वातंत्रवीर सावरकर मैदानाची संयुक्त पाहणी करत सभास्थळ, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, गर्दी नियंत्रण आदी बाबींचे सविस्तर नियोजन केले. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या जाहीर सभेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार असून, चिपळूणचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Total Visitor Counter

3369881
Share This Article