GRAMIN SEARCH BANNER

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक: दाभोळे येथे हजरत कमालुद्दीन वली यांचा ‘उर्स’ सोहळा उत्साहात साजरा होणार

Gramin Varta
58 Views

दाभोळे/सिकंदर फरास:  संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे हजरत कमालुद्दीन वली (रहमतुल्ला अलैह) यांचा उर्स-ए-शरीफ सोहळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

२९ आणि ३० जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाची जय्यत तयारी नुरानी कमिटी दाभोळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

धार्मिक परंपरेनुसार या सोहळ्याचे आयोजन दोन दिवसांत विभागले गेले आहे.

▪️गुरुवार, २९ जानेवारी २०२६ रोजी  सायंकाळी ४:३० वाजता गुसुल शरीफ विधी पार पडेल.
▪️शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता संदल-ए-मुबारकची मिरवणूक काढण्यात येईल.
▪️रात्री ९:०० वाजता
नियाज-ए-तबरुक (महाप्रसाद) वाटपाचे आयोजन केले आहे.

दाभोळ्यामधील हे श्रद्धास्थान दोन्ही धर्मांतील लोकांसाठी आस्थेचे केंद्र राहिली आहे.हा उरूस परिसरातील हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.

या कार्यक्रमाला श्री.अनंत भिवा बेलकर आणि त्यांच्या सर्व  परिवाराचे विशेष सहकार्य लाभते. नुरानी कमिटीचे अध्यक्ष श्री.अब्बास थोडगे आणि मित्रमंडळींकडून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन प्रतिवर्षी  केले जाते.तरी सर्व भाविकांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

स्थळ: मु. पो. दाभोळे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
आयोजक: नुरानी कमिटी दाभोळ व समस्त ग्रामस्थ.

Total Visitor Counter

3379494
Share This Article