चिपळूण (प्रतिनिधी) : कोंढे येथील रिगल पब्लिक स्कूल (सीबीएसई)च्या सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अकसा चौगुले हिने एमएच- सीईटी २०२५ च्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. परीक्षेत तिने ९६.३३ टक्के मिळवून दमदार यश मिळवले. सी. बी. एस. ई. बोर्ड कोकण विभागामध्ये ९६ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान तिने मिळवला आहे. अकसा चौगुले हिचे रिगल एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के तसेच महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सिंग यांनी अभिनंदन केले.
चिपळूण शहरात राहूनहि चांगले शिक्षण घेऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे. रिगल एज्युकेशन सोसायटीमध्ये फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट चे अभ्यासक्रम, आयटीआयमधील सिव्हिल ड्राफ्टसमन २ वर्ष, इलेक्ट्रीशियन २ वर्ष, वेल्डर १ वर्ष, कोपा – १ वर्ष, डिझेल मेकॅनिक – १ वर्ष, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट – २ वर्ष, नर्सिंग – १ वर्ष, डी. एम. एल. टी. – २ वर्ष, रेडिओलॉजिस्ट – १ वर्ष, कार्डिओलॉजिस्ट – २ वर्ष, ऑपरेशन थियटर टेक्निशिअन – १ वर्ष, आर्किटेक्चर ड्राफ्टसमन – २ वर्ष, इ. अभ्यासक्रम शिकवले जातात. सर्व सोयींनी सुसज्ज वर्ग,अध्यापकवर्ग, प्रयोगशाळा, लॅब, खेळ, इतर वर्कशॉप, प्रशस्त वाचनालय, वसतिगृह, १०० टक्के स्कॉलरशिपची सोय, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना संस्थेकडून शिष्यवृत्ती दिली जाते. पास सवलत इत्यादी सोयी संस्थेकडून दिल्या आहेत. या सर्वांचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांनी केले आहे.
रिगलची विद्यार्थिनी अकसा चौगुले हिचे एमएच-सीईटी परीक्षेत यश

Leave a Comment