GRAMIN SEARCH BANNER

सवतसडा धबधबा परिसरात पत्रा वाहतुकीचा कंटेनर गटारात; चालक गंभीर जखमी

Gramin Varta
256 Views

चिपळूण : मुंबई–गोवा महामार्गावरील सवतसडा धबधबा परिसरात मंगळवारी सकाळी कंटेनरचा भीषण अपघात झाला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने रस्त्यालगत असलेल्या दिशा दर्शक फलकाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर थेट लगतच्या नाल्यात कोसळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर कंटेनर पत्रा वाहतुकीसाठी मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होता. सवतसडा परिसरातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातानंतर कंटेनरमधील पत्रे महामार्गावर विखुरली गेली, तर दिशा दर्शक फलकाचा खांब वाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
या घटनेमुळे मुंबई–गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला रुग्णालयात पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

Total Visitor Counter

3379415
Share This Article