GRAMIN SEARCH BANNER

राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हृदयविकार उपचार केंद्रांची उभारणी

मुंबई: राज्यात पुण्‍यासह जालना, गडचिरोली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये हृदय तपासणी व उपचार कक्ष (कार्डियाक कॅथलॅब) उभारणीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे.

त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. पुण्‍यात ही ‘कॅथलॅब’ औंध जिल्‍हा रुग्‍णालयात कार्यान्वित होईल. हा प्रकल्‍प हृदयविकार असलेल्‍या रुग्‍णांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

प्रकल्‍पात ॲंजिओग्राफी, ॲंजिओप्‍लास्‍टी हे उपचार मोफत होतील. त्‍याचबरोबर हृदयाची झडप (व्‍हॉल्‍व) व हृदयाचे ठोके नियमित राखण्यासाठी हृदयात बसवले जाणारे ‘पेसमेकर’ हे उपकरण बसवता येईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘ईपीसी’ पद्धतीने करण्यात येणार असून यामध्ये कॅथलॅब उभारणीसाठी आवश्यक असलेली संरचनात्मक रचना, यांत्रिकी, विद्युत, प्लंबिंग आराखडे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, उभारणी, चाचणी, साठवण, वितरण तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन या सर्व बाबींचा समावेश राहील. आतापर्यंत हृदयविकाराच्या गंभीर रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या तपासण्या व उपचारांसाठी खासगी रुग्‍णालयात जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांच्या उपचारात विलंब होण्याबरोबरच आर्थिक भार आणि मानसिक तणावही वाढत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘कार्डियाक कॅथलॅब’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Total Visitor Counter

3486968
Share This Article