GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुका बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद जाडकर

खेड: खेड तालुका बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अॅड. मिलिंद जाडकर यांची निवड झाली. त्याबद्दल खेड तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे सत्कार करण्यात आला.

कायदा क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची निवड झाल्याबद्दल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

यावेळी भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभवजी खेडेकर, प्रशांत कुलकर्णी, संजय बुटाला, भाजपा रत्नागिरी जिल्हा चिटणीस तसेच राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी, वैजेश सागवेकर, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. जाडकर यांच्या निवडीमुळे बार असोसिएशनच्या माध्यमातून कायदेविषयक कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3430504
Share This Article