GRAMIN SEARCH BANNER

मराठमोळा रोहित राऊत ठरला पहिला I-POPSTAR

Gramin Varta
196 Views

मुंबई: इंडिपेंडंट पॉप संगीत क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरलेला I-POPSTAR चा पहिला विजेता जाहीर झाला असून, लोकप्रिय मराठमोळा गायक रोहित राऊतने हा मान पटकावला आहे.

सहा आठवड्यांच्या दमदार आणि ओरिजिनल म्युझिक परफॉर्मन्सनंतर रोहितने प्रेक्षक आणि परिक्षकांची मने जिंकत विजेतेपद आपल्या नावे केले.

कार्यक्रमात रोहितच्या अनोख्या संगीतशैली, स्टेजवरील प्रभावी प्रस्तुती आणि सततच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सचे मोठे कौतुक झाले. अंतिम फेरीत रोहितने सिंहगर्जना करत विजेतेपद पटकावले आणि त्याचबरोबर ₹7,00,000 ची भव्य पारितोषिक रक्कम आणि आयकॉनिक ट्रॉफी घरी आणली.

I-POP च्या या पहिल्या सीझनने इंडिपेंडंट पॉप संगीत क्षेत्रात नवी दिशा दाखवली असून, रोहित राऊतच्या विजयानंतर या संगीतप्रकारासाठी नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांकडून रोहितवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रोहित राऊतचे हे यश केवळ त्याच्या प्रतिभेचा पुरावा नसून, इंडिपेंडंट कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Total Visitor Counter

3369535
Share This Article