GRAMIN SEARCH BANNER

देवरूखमधील डिकॅड कला महाविद्यालयात वार्षिक संकल्पन २०२६ चे उद्घाटन

देवरूख-संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील क्रेडार संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन या कला महाविद्यालयाच्या वार्षिक संकल्पन २०२६ चे उद्घाटन रविवारी सुप्रसिद्ध निसर्ग चित्रकार कुडलया हिरेमठ, पुणे यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक प्रफुल्ल सातोकर हे परीक्षक म्हणून लाभले, क्रेडारचे सेक्रेटरी विजय वीरकर हेही उपस्थित होते. याच दिवशी मालवण येथील कलाशिक्षक समीर चांदरकर यांना कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र व रोख रक्कम असे होते. संकल्पनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासातील गुणांसाठी त्यांचा सन्मान करतो. या बक्षीस समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा बेस्ट स्टुडण्टचा ॲवार्ड चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कु. प्रतिक अक्कतंगेरहाळ याला देण्यात आला.

याप्रसंगी पालक, पत्रकार, मा. सुरेश जोशी यांचीही उपस्थिती लाभली होती. त्याच दिवशी संध्याकाळी देवरुख नगर पंचायत  नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी चे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. चार दिवस चालणाऱ्या या संकल्पनमध्ये निसर्ग चित्रणचे प्रात्यक्षिक झाले, विद्यार्थ्याचे  पर्सनलिटी  contest घेण्यात आली. क्रीडा स्पर्धा v करा ओके म्युझिक  नाईटने संकल्पनची सांगता होणार आहे. तरी सर्व रसिकांनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3487550
Share This Article