GRAMIN SEARCH BANNER

लांजा: निवसर बौध्दवाडी येथून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लांबविली

Gramin Varta
92 Views

लांजा: तालुक्यातील निवसर बौद्धवाडी येथे उभी करून ठेवलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३०  ते १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ या कालावधीत घडली आहे.
             
याबाबतची तक्रार विकास सखाराम कांबळे (वय ४०, रा.निवसर बौद्धवाडी, ता.लांजा)  यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. विकास कांबळे यांनी आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल (क्रमांक एम.एच.०८ बीएफ २९३२)  ही १८ फेब्रुवारी रोजी कामावरून घरी आल्यानंतर रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्याने ही मोटर सायकल वाडीतील नालंदा बौद्ध विहाराजवळ उभी करून ठेवली होती. तेथून अज्ञात चोरट्याने ही मोटरसायकल त्या जागेवरून चोरून नेली.‌
        
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विकास कांबळे यांना आपली मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात झाले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात मोटरसायकलचा शोध घेतला व नंतर लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
             
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जान्हवी मांजरे या करीत आहेत.

Total Visitor Counter

3374162
Share This Article