GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरमध्ये धुलीवंदन उत्साहात; नावडी आणि रामपेठ येथून निघाले धुळवडीचे फेरे!

Gramin Varta
66 Views

संगमेश्वर (वार्ताहर) : संगमेश्वरमध्ये धुलीवंदन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले धुळवडीचे फेरे नावडी आणि रामपेठ येथून काढण्यात आले. या फेऱ्यांची सुरुवात नावडी व रामपेठ येथून होते व मुख्य बाजारपेठ येथून परत फिरतो या वेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि पिपाणीच्या सुरेल तालावर संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हातात निशाण घेतलेली मुले, गुलालाची उधळण आणि वाजंत्री यांच्या तालावर धरलेला फेर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.या सोहळ्यात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकमेकांना गुलालाचा रंग लावला आणि आनंदाने धुलीवंदन साजरे केले. जाखमातेच्या नावानं चांगभलं असा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या नादात संगमेश्वरची बाजारपेठ गुलालमय झाली होती.

Total Visitor Counter

3375162
Share This Article