GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत कॉलेज विद्यार्थ्याचा लॅपटॉप लंपास; मिरजोळे परिसरातील घरफोडीप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी: शहरातील मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेज परिसरातील एका भाड्याच्या खोलीतून विद्यार्थ्याचा महागडा लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. २ मार्च २०२६ रोजी पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली असून, याप्रकरणी ७ मार्च रोजी रात्री रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका अनोळखी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी चिन्मय अजित नाईक (वय २०, मूळ रा. गाळेल, ता. सावंतवाडी) हा विद्यार्थी मिरजोळे येथील घर नं. ६७७ मध्ये भाड्याने राहून शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी चिन्मयच्या खोलीतून २५ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा ‘लेनोव्हा’ कंपनीचा सेकंड हॅण्ड लॅपटॉप (मॉडेल नं. DESKTOP-HR8FVRI, १६ जीबी रॅम) अज्ञात चोरट्याने लंपास केला.

या लॅपटॉपवर विविध स्टिकर्स लावलेले असून त्याचा सिरीयल नंबर PG03XH70 असा आहे. चिन्मयने दिलेल्या तक्रार अर्जाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.याप्रकरणी पोलिसांनी एका अंदाजे ३० वर्षे वयाच्या अनोळखी इसमाविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. सदर संशयित हा दाढी वाढलेला, कुरळ्या केसांचा असून त्याने अंगात चौकडी शर्ट, निळी जिन्स पॅन्ट आणि पाठीवर निळ्या रंगाची कॉलेज बॅग अडकवली होती. हा तरुण दक्षिण भारतीय असल्यासारखा वाटत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गु.आर.क्र. ६२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि वर्णनावरून या संशयित चोरट्याचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3486654
Share This Article