विश्वासघाताने साडेदहा लाखांचा ट्रक हडपला; मिरजेच्या संशयितावर नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील एका व्यावसायिकाचा विश्वासाने दिलेला साडेदहा लाख रुपये किमतीचा ट्रक परस्पर हडप केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात मिरज येथील एका संशयिताविरुद्ध फौजदारीपात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूपाळ भिकाजी तारकर (वय ४२, रा. बाकाळे, ता. राजापूर) यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा ‘इंट्रा व्ही ३०’ मॉडेलचा पिकअप ट्रक (क्रमांक एम एच ०८ एपी ७९१२) आरोपी परमेश्वर केशव जाधव (रा. गणेश तलाव, मिरज, जि. सांगली) याला विश्वासाने वापरण्यासाठी दिला होता. ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, बराच काळ लोटल्यानंतर फिर्यादी तारकर यांनी आपल्या मालकीचा ट्रक परत करण्याची मागणी केली असता, आरोपीने तो देण्यास टाळाटाळ केली.आपल्या मालकीचा १० लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक आरोपीने परत न करता, तो अप्रामाणिकपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीचा विश्वासघात केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी भूपाळ तारकर यांनी ६ मार्च रोजी नाटे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी परमेश्वर जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (१) व (२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नाटे पोलीस करत असून, फसवणूक झालेला ट्रक हस्तगत करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *