GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्री आयटीआयमध्ये महिंद्रा थार रॉक्सच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर कार्यशाळा संपन्न

सावर्डे:सह्याद्री शिक्षण संस्था संचलित सह्याद्री आयटीआय आणि महिंद्रा अँड महिंद्रा नाईक मोटर्स चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘महिंद्रा थार रॉक्स द एसव्ही ४एक्स’ या वाहनाच्या संदर्भात ॲडव्हान्स व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग नुकतेच पार पडले. या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेसाठी नाईक मोटर्स चिपळूणचे सेल्स कन्सल्टंट उमेश गुरव, असिस्टंट पियुष तांबे आणि तुषार तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत मेकॅनिक मोटर व्हेईकल विभागाचे निदेशक प्रशांत भिसे, प्रथमेश पाटील, प्रशांत राजेशिर्के आणि गजानन शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.या प्रशिक्षणादरम्यान मेकॅनिक मोटर व्हेईकलच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासक्रमांतर्गत स्किल डेव्हलपमेंटनुसार बीएस ६ वाहनांमध्ये करण्यात आलेल्या तांत्रिक बदलांची सविस्तर माहिती देण्यात आली. उमेश गुरव यांनी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी, इंजिन ड्रॅग टॉर्क, व्हेईकल डायनामिक व्हील होल्ड, रोल ओव्हर इरिगेशन, इमर्जन्सी स्टॉप, व्हेईकल स्टेटस अलर्ट आणि इलेक्ट्रिक पार्क ब्रेक यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. तसेच ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम, अलेक्सा सिस्टीम आणि वायरलेस चार्जिंग या नवीन तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले.

महिंद्रा अँड महिंद्राच्या या अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा फायदा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीत निश्चितपणे होईल, अशी आशा निदेशक प्रशांत भिसे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी सह्याद्री आयटीआयचे प्राचार्य उमेश लकेश्री यांच्यासह सर्व निदेशक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक विजय सुर्वे यांनी केले.

Total Visitor Counter

3485115
Share This Article