खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर; उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

खेड :खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड करण्यात आली. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या निवडणुकीदरम्यान सर्व प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून कामकाज पार पाडण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर आणि उपसभापतीपदी सुनील मोरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी डॉ. अफिया पालेकर आणि सुनील मोरे यांना त्यांच्या दालनात नेऊन अधिकृत खुर्चीत विराजमान करून पदग्रहणाचा सोहळा पार पाडला. या वेळी उपस्थितांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर आणि उपसभापती सुनील मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *