लोटे एमआयडीसीतील स्फोटातील जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

खेड :- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रियल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या ११ कामगारांपैकी रघुनाथ खंडू खामकर (वय ५७, रा. मुरडे शिंदेवाडी, ता. खेड) यांचा मंगळवारी पहाटे नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.ही दुर्घटना दि. ६ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता घडली होती. या स्फोटात एकूण ११ कामगार गंभीररीत्या भाजले होते. त्यापैकी नंदकिशोर राणे (४५, दाभिल खोतवाडी), रणजित सुभाष राणे (४०, दाभिल खोतवाडी), सुजन गोपाळ दास (२९, सुपरवायझर, रा. आवाशी माळवाडी), निखिल रवींद्र मोरे (३४, शिरळ मोरेवाडी, ता. चिपळूण) तसेच फिर्यादी शिवानंद बाबुराव खोंडे (३२, रा. लोटे धापसेवाडी, मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर) या जखमी कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तसेच असद इमाममुद्दीन खान (४४, पटवर्धन लोटे), अरमान जुनेद शाह (२९, विक्रमगंज, पटणा, बिहार), समीर इनायतुला शेख (२२, अहमदपूर, जि. लातूर) यांना परशुराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर महंमद इलियास मुरूम मुश्ताक शेख (२७, पटणा, बिहार), परवेझ सादिक शेख (२२, अहमदपूर, लातूर) आणि मृत रघुनाथ खंडू खामकर यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान खामकर यांचा मृत्यू झाला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *