GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी हंगामासाठी दोन विशेष गाड्या

Gramin Varta
181 Views

रत्नागिरी: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव दरम्यान दोन विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१६ एप्रिल १२ जून या कालावधीत या गाड्या धावणार आहेत.

मुंबई सीएसएमटी – मडगाव आणि एलटीटी – मडगाव अशा दोन विशेष गाड्यांच्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यांचा तपशील असा – १. मुंबई सीएसएमटी – मडगाव – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) गाडी क्र. ०११७१: मुंबई सीएसएमटी येथून १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११७२ मडगाव येथून १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी दुपारी १६ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबेल.

२. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव – LTT स्पेशल (साप्ताहिक) गाडी क्र. ०१११९ १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११२० मडगाव येथून १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडीही आधी उल्लेख केलेल्या थांब्यांवर थांबेल.दोन्ही गाड्यांचे आरक्षण १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल.

Total Visitor Counter

3198648
Share This Article