उद्योजक रविंद्र तथा अण्णा सामंत व युवा नेत्या अपूर्वा सामंत यांची प्रमुख उपस्थिती
लांजा/ अरबाज नेवरेकर :रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवण्याच्या उद्देशाने शिवसेना अल्पसंख्याक सेल, तालुका लांजा यांच्या वतीने आयोजित दावत-ए-इफ्तार कार्यक्रम बुधवारी सायंकाळी अत्यंत उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रम लांजा येथील जामा मशीद शेजारी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. या इफ्तार मेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अण्णा सामंत उपस्थित होते. तर यावेळी युवानेत्या अपूर्वा सामंत यां देखील उपस्थित होत्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महंमद शेठ रखांगी, जमातुल मुस्लिमीन लांजा चे अध्यक्ष शौकत नाईक, निळकंठ बगळे (पोलीस निरीक्षक), सुरेश कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी), गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, शिवसेना क्षेत्रप्रमुख सुनिल (राजू) कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नगराध्यक्षा सावली कुरूप, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर तसेच नगरसेवक रफिक (गुल्ल्या) नेवरेकर तसेच उद्योजक हनिफ नाईक, गनी मुलाणी, असीम मुलाणी तसेच सामाजिक कार्यकर्ते हुसेन नेवरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी इफ्तारमध्ये सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सईद मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ताफ काझी, साजिद शेख, शादाब काझी, जैनू लांजेकर, अकिल नाईक, इलियास बंदरी, मुख्तीयार साटविलकर, मोसीन दसुरकर, अझर पावसकर, अरबाज नेवरेकर, वसीम मुजावर, राजू मुजावर, आजीम वाघू, अशकान मुजावर आणि नियात मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, दावत-ए-इफ्तारच्या निमित्ताने सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन उपवास सोडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रसंगी बोलताना उद्योजक आण्णा सामंत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व महंमद रखांगी यांनी समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






