मिलिंद देसाई / चिपळूण : आरोग्य मंदिर (रत्नागिरी) येथील कै. राजेंद्र रेमणे (वय ६०) यांचे ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या परिवाराने मरणोत्तर देहदान व नेत्रदान करून समाजासमोर सेवेचा आदर्श ठेवला आहे.
कै. रेमणे यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी स्वाती रेमणे व मुलगी श्रद्धा रेमणे यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करत वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण येथे देहदान तसेच नेत्रदान केले.
या वेळी पत्नी स्वाती रेमणे, मुलगी श्रद्धा राजेंद्र रेमणे, मेहूणे मिलिंद देसाई, मयूर देसाई यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.रेमणे कुटुंबियांनी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
चिपळुणातील राजेंद्र रेमणे यांचे मरणोत्तर देहदान; वालावलकर मेडिकल कॉलेज, डेरवणकडे पार्थिव सुपूर्द
