राजन लाड / जैतापूर
जैतापूर माजरेकरवाडी येथील शंभर वर्षांची आयुष्ययात्रा पूर्ण करणाऱ्या सुनेत्रा ऊर्फ सुलोचना दिगंबर माजरेकर (वय 100) यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने शांत देहावसान झाले.
त्यांनी कठीण परिस्थितीत नऊ मुलांचा सांभाळ करून कुटुंबाला आधार दिला. त्यांच्या सुपुत्रांपैकी स्वर्गीय भास्करदादा माजरेकर, कै. दुर्गाप्रसाद, मधुसूदन, विजयभारत, संजय माजरेकर यांनी सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी केली. सौम्य, संयमी आणि दयाळू स्वभावामुळे त्यांना समाजात विशेष मान मिळाला होता.
आई भवानीवरील गाढ श्रद्धा, तसेच गीत रामायण आणि मृत्युंजय कादंबरीवरील त्यांचा जिव्हाळा उल्लेखनीय होता. अखेरच्या दिवसांत त्यांची सेवा कन्या प्रतिभाताई यांनी केली.
मुंबईत त्यांचे निधन झाल्याने आणि त्या जैतापूर माजरेकर वाडीच्या असल्याने गावात व परिसरात शोककळा पसरली असून समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना सर्वांनी केली आहे.
जैतापूरच्या सुनेत्रा माजरेकर यांचे 100 व्या वर्षी मुंबईत निधन
