रत्नागिरी : महिला सक्षमीकरण, पर्यावरण, सामाजिक उपक्रमांकरिता गिरिजात्मक फाउंडेशनची स्थापना

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सौ. प्राजक्ता प्रवीण रुमडे यांनी ‘गिरिजात्मक फाउंडेशन’ या सेवाभावी धर्मादाय संस्थेची स्थापना केली आहे. ही सदर संस्था धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात विधिवत नोंदणीकृत असून, विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा निर्धार आहे.

या फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध मार्गदर्शन उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि जागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करून त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रमही हाती घेतला जाणार आहे.

पर्यावरण संवर्धन हा संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा ध्येयविषय असून वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर धार्मिक व सांस्कृतिक सण-समारंभ साजरे करून सामाजिक एकात्मता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक त्या वास्तू व सुविधा उभारण्याचाही संस्थेचा मानस आहे.

आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी योग व ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. अशा विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गिरिजात्मक फाउंडेशन कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता रूमडे यांनी दिली.

संस्थेच्या कार्यकारिणीत प्रवीण रुमडे, सौ. संपदा नांदगावकर, सौ. प्रिया भारती, श्रीमती साक्षी मयेकर, सौ. श्रुतिका सुर्वे आणि कु. अमेय रुमडे हे सन्माननीय सदस्य म्हणून कार्यरत असून, त्यांच्या सहकार्याने संस्थेचे कार्य अधिक व्यापक व प्रभावी होणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *