GRAMIN SEARCH BANNER

होर्मुजवर 35 देश करणार विचारमंथन, भारतालाही चर्चेचे आमंत्रण

Gramin Varta
42 Views

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाच्या दरम्यान, भारताने इराणहून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर, युनायटेड किंगडमने (युके) भारताला होर्मुजवर 35 देशांच्या चर्चेत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत माहिती दिली. तसेच भारताने आतापर्यंत 1200 नागरिकांना इराणमधून बाहेर काढले असून यात 845 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात जायसवाल म्हणाले की, या 1200 पैकी 996 नागरिकांना आर्मेनियाला आणि 204 जणांना अजरबैजानला पाठवण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील भारतीय मिशन्स आणि स्थानिक अधिकाऱ्यांसह मिळून, विदेश मंत्रालय या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक व्यवस्था करत आहे. ट्रांझिटदरम्यान त्यांना संपूर्ण सहाय्य मिळेल याची खबरदारी घेतली आहे. तसेच युनायटेड किंगडमने भारताला होर्मुजवर 35 देशांच्या चर्चेत वर्च्युअली सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. भारतीय विदेश सचिव विक्रम मिसरी या बैठकीत वर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. सरकारने आर्मेनिया आणि अजरबैजानच्या मार्गाने त्यांची सुरक्षित सुटका करण्याचे नियोजन केले होते, कारण थेट इराणहून भारतासाठीचा हवाई मार्ग प्रभावित झाला होता. दोन्ही शेजारी देशांमधील भारतीय दूतावासांना सक्रिय करून नागरिकांना त्वरित मदत मिळावी याची खबरदारी घेण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

तसेच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांशी सतत संवाद साधला आहे. गेल्या 28 मार्च रोजी पीएम मोदी यांनी सऊदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी पश्चिम आशियातील संघर्षावर सखोल चर्चा झाली. प्रधानमंत्रींनी या क्षेत्रातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचे गांभीर्य व्यक्त केले आणि दोन्ही नेत्यांनी मुक्त नौवहन व शिपिंग मार्ग सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. संघर्ष आता दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, पश्चिम आशियातून भारत परत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत 6 लाखाहून अधिक भारतीय नागरिक या प्रदेशातून परतल्याचे जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

Total Visitor Counter

3248912
Share This Article