GRAMIN SEARCH BANNER

जिल्हास्तरिय धनुर्विद्या  निवड चाचणी स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कुलचे  घवघवीत यश

Gramin Varta
34 Views

मकरंद सुर्वे /संगमेश्वर : रत्नागिरी जिल्हा असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये भाईशा घोसाळकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले .  भाईशा घोसाळकर हायस्कुल च्या चार विद्यार्थ्यांची  हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली.

रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरिय निवड चाचणी स्पर्धेत  आर्या अनिल जोशी  हिने तृतीय क्रमांक  मिळवत ब्रांझ मेडल पटकावले .स्वरा सुजित इंजळे हिने मुलींच्या गटात  चौथा क्रमांक तर स्वराज मिलिंद चव्हाण  यान मुलांच्या गटात चौथा क्रमांक पटकावला .साईराज अरविंद सुर्वे  याने पाचवा क्रमांक पटकावला .या चारही विद्यार्थ्यांची हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीत धनुर्विध्या अजिंक्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली .सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर , सचिव वसंत उजगावकर , संचालक जितेंद्र चव्हाण , सदानंद ब्रीद , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण , मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी   अभिनंदन  केले व पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. यासाठी क्रीडाशिक्षक संतोष साळुंके यांनी विशेष मेहनत घेतली.

Total Visitor Counter

3206092
Share This Article