संगमेश्वर : तालुक्यातील नायरी गावाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू झैद पाटणकर याची निवड इंग्लंड दौऱ्यासाठी होणाऱ्या मुंबईच्या युवा क्रिकेट संघात करण्यात आली आहे. ही बातमी नायरी गावासह संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.
सदर दौऱ्यात मुंबईचा संघ ५ दोनदिवसीय सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळणार असून, स्पर्धा अत्यंत दर्जेदार असून त्यातून युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव मिळणार आहे.
या संघाचे नेतृत्व आयपीएलमध्ये पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुर्यांश शेंडगे याच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ मोठ्या विजयासाठी सज्ज झाला आहे.
झैद पाटणकर याने याआधी अनेक स्थानिक आणि जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये आपली चमक दाखवत इतरांचे लक्ष वेधले होते. इंग्लंड दौऱ्यामुळे त्याच्या खेळगदीरीला नवे वळण मिळेल, असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांनी आणि कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
संगमेश्वर: नायरीचा झैद पाटणकर इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबई संघात!
