संगमेश्वर मठ-धामापूर परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीती

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

संगमेश्वर : तालुक्यातील सांगवे गावचे माजी सरपंच देवदत्त शेलार हे देवरुखहून कुडवली मार्गे सांगवे येथे जात असताना सोमवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास मठ-धामापूर परिसरात बिबट्याचे दर्शन झाले.

मठ धामापूर येथील कमानीसमोरील मंगेश गुरव यांच्या घराजवळ बिबट्या दिसून आला. जवळील नदी परिसरातून रस्ता ओलांडत बिबट्या थेट गुरव यांच्या अंगणातून जंगलाच्या दिशेने गेल्याचे शेलार यांनी चित्रीत केलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच वनविभागाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *