लांजा : उद्या आगरवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळा; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

लांजा/ अरबाज नेवरेकर: शहरातील आगरवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा १८ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार, ९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आगरवाडी ग्रामस्थ मंडळ उत्सवासाठी सज्ज झाले आहे.

गुरुवारी सकाळी ९ वाजता अभिषेक व मूर्तीपूजेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार असून, दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळच्या सत्रात ७ ते ८ या वेळेत चैतन्य संप्रदाय आगरवाडी यांच्या वतीने हरिपाठाचे वाचन होईल, तर रात्री ८ वाजता ढोलवादनाचा गजर होणार आहे. रात्री ९ वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडल्यानंतर रात्री १०:३० वाजता कलाकारांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथील प्रसिद्ध ‘श्री रवळनाथ रिमिक्स लयभारी’ नमन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

या सोहळ्याचे नियोजन आगरवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष प्रमोद आगरे, वाडीप्रमुख काशिराम आगारे, सचिव अजय आगरे यांच्यासह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सल्लागार आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *