GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड-नांदेड नवीन एसटी बससेवेचा शुभारंभ

मंडणगड: कोकणातून मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मंडणगड आगाराने दापोली-खेड-चिपळूणमार्गे नांदेड ही नवीन एसटी बससेवा १५ एप्रिलपासून सुरू केली आहे. या नव्या लांब पल्ल्याच्या फेरीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, या मार्गावरील प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ही बस दररोज पहाटे ४.३० वाजता मंडणगड बसस्थानकातून नांदेडकडे रवाना होईल, तर नांदेड येथून सकाळी ४ वाजता ही बस मंडणगडसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.

या नवीन बससेवेचा प्रारंभ होताना मंडणगड आणि दापोली बसस्थानकात बसचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे, एसटी प्रवासीमित्र संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, खजिनदार आसिफ खलपे, मंगेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील आणि कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोकण आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या महत्वपूर्ण एसटी फेरीमुळे व्यापारी, नोकरदार आणि पर्यटकांना थेट प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे.

Total Visitor Counter

3485147
Share This Article