चिपळूण (प्रतिनिधी):- खेड तालुक्यातील काडवली बौद्धवाडी शाखा क्रमांक ९४ व महिला- मुंबई स्थानिक भावकी आयोजित क्रिकेट स्पर्धेत फ्रेंडस इलेव्हन चिपळूण संघाने मल्लिकार्जुन प्रसन्न संघावर मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तृतीय क्रमांकाचे संदेश इलेव्हन चोरवणे तर चतुर्थ क्रमांकाचे जय हनुमान ट्रस्ट काजवेवाडी हे संघ मानकरी ठरले. या संघांना काडवलीच्या सरपंच सौ. भक्ती महाडिक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश महाडिक, माजी उपसरपंच राकेश महाडिक, संतोष सावर्डेकर, सुशील महाडिक, प्रमोद पवार आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा नुकतीच काडवली येथे पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन काडवलीच्या सरपंच सौ. भक्ती महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेतील सामने अटीतटीचे झाले. चिपळूण, धामणंद, चोरवणे, तळवट, काडवली गावातील संघाने सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची मोठी गर्दी होती.
या स्पर्धेतील अंतिम सामना फ्रेंड्स इलेव्हन विरुद्ध मल्लिकार्जु प्रसन्न यांच्यात झाला. हा सामना फ्रेंड्स चिपळूण संघाने जिंकत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेता संघ फ्रेंडस इलेव्हन संघाला रोख रक्कम १० हजार रुपये व आकर्षक चषक काडवली गावच्या सरपंच सौ. भक्ती महाडिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर उपविजेता मल्लिकार्जुन प्रसन्न संघाला ७ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक सामाजिक कार्यकर्ते संतोष सावर्डेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच संदेश इलेव्हन चोरवणे संघाला ३ हजार ३९९ रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक सुरेश महाडिक यांच्या हस्ते तर चतुर्थ संघाला २ हजार ३९९ रुपये व आकर्षक चषक सुशील महाडिक यांच्या गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेतील सामनावीर व मालिकवीर म्हणून नाजीम या खेळाडूला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे समालोचन विनोद कदम, सचिन मोहिते यांनी केले. ललित आयरे व संदीप मोहिते यांनी पंचाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काडवली बौद्धवाडी स्थानिक भावकीचे अधिक संदीप मोहिते, विजय मोहिते, निलेश मोहिते, विलास मोहिते, सचिन मोहिते, भगवान मोहिते, चंद्रकांत मोहिते, प्रमोद पवार, प्रदीप कदम, प्रमोद मोहिते, विनोद मोहिते, दीपक जाधव, आर्यन मोहिते, अभिषेक मोहिते, श्रेयश मोहिते, निहार पवार, मिहीर मोहिते, यजु मोहिते, आयुष मोहिते, शार्दुल तांबे, सेजल मोहिते, साई मोहिते, अनुष्का तांबे, मयुरी मोहिते, राजेश वरक, गणेश वरक आदी युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
खेड: काडवली येथील क्रिकेट स्पर्धेत फ्रेंडस इलेव्हन चिपळूण विजेता तर मल्लिकार्जुन प्रसन्न संघ उपविजेता




