कुडाळमध्ये रत्नागिरी आरपीएफची मोठी कारवाई; रेल्वे तिकीट दलाल जेरबंद

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी:  रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत रत्नागिरी आरपीएफ पथकाने कुडाळ रेल्वे स्थानकावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका तिकीट दलालाला रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याकडून ३,५८० रुपये किमतीचे तत्काळ तिकीट जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ रेल्वे स्थानकातील पीआरएस केंद्रावर संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या रत्नागिरी आरपीएफच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

पकडण्यात आलेल्या आरोपीची प्राथमिक चौकशी आणि तांत्रिक पडताळणी केल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कणकवली आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रवाशांची लूट करणाऱ्या दलालांवर यापुढेही कडक नजर ठेवली जाणार असल्याचे रत्नागिरी आरपीएफ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *