GRAMIN SEARCH BANNER

कोकणचा साज, संगमेश्वरी बाज कार्यक्रमाचा सहाशेवा प्रयोग उत्साहात

रत्नागिरी: “कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” या कोकणातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने ६०० प्रयोगांचा यशस्वी टप्पा गाठत प्रेक्षकांचे मन पुन्हा एकदा जिंकले.

या उल्लेखनीय यशानिमित्त कार्यक्रमातील कलाकारांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे कार्यक्रमातील प्रमुख कलाकार सुनील बेंडखळे तसेच “चला हवा येऊ द्या” फेम कलाकार सचिन काळे यांचा सन्मान करण्यात आला.संगमेश्वर येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमासाठी पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत खातू, निशिकांत कुचेकर, नावडी विभागप्रमुख वैभव मुरकर, उपविभाग संघटक सिद्धेश सावंत, शाखाप्रमुख जनार्दन रहाटे, नीलेश बोले यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी कलाकारांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोकणचा साज, संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाने ग्रामीण भागातील विनोदाची परंपरा जपत प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम सातत्याने केले असून, सहाशेवा प्रयोग हा त्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Total Visitor Counter

3486541
Share This Article