रत्नागिरी – नागपूर महामार्गवरील मुर्शी जवळ डिझेल टँकर पलटी झाल्याने डिझेल गेले वाहून

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रमेश शिंदे / भडकंबा:   संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर मार्गांवरील मुर्शी जवळील गोवरेवाडी बस थांब्याजवळ डिझेल टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सुरेश आनंदा पवार वय ३९राहणार बेडग ता. मिरज जि. सांगली हा आपल्या ताब्यातील डिझेल टँकर एम एच १०सी आर ५१८४मिरज ते रत्नागिरी ( एस टी डेपो रत्नागिरी )असा घेऊन जात असताना मुर्शी पोलीस चौकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल वाहून गेले. व झालेल्या अपघातात चालक सुरेश पवार जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी कुर्ले -पावसकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अनर्थ टाळला. पोलीस कार्यवाही सुरु आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *