ब्रेकिंग: कोकणातून प्रमोद जठार यांना भाजपाकडून विधान परिषदची उमेदवारी जाहीर

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पक्षाकडून पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे विवेक कोल्हे आणि माधवी नाईक यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते केशव उपाध्ये यांना यंदाही विधान परिषदेच्या उमेदवाराने हुलकावणी दिली आहे.

भाजपने कोणते पाच उमेदवार जाहीर केले

प्रमोद जठार

सुनील कर्जतकर
माधवी नाईक
संजय नत्थूजी भेंडे
विवेक कोल्हे

कोकणातून प्रमोद जठार यांना संधी

प्रमोद जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नेतृत्व आहे. अतिशय अभ्यासू आणि आक्रमक राजकारणी म्हणून प्रमोद जठार यांना ओळखले जाते. कॉलेज जीवनापासून त्यांनी भाजपचे काम केले. कोकणात भाजपचा आक्रमकपणे विस्तार करण्यात जठार यांचा सिंहाचा वाटा आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *