देवरुख: एकजूट आणि लोकसहभागातून अशक्य गोष्टीही शक्य होतात, याचा प्रत्यय आज सांगवे ग्रामस्थांनी दिला आहे. सप्तिलिंगी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी हाती घेतलेल्या कामाचा दुसरा टप्पा आज यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
या कार्यासाठी नाम फाउंडेशनने केलेल्या मदतीचा वाटा मोठा आहे. फाऊंडेशनकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोकलॅन मशीनच्या चालकांचा आणि वाहकांचा आज सांगवे ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नाम फाउंडेशन मोलाच्या तांत्रिक सहकार्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी. विशेषतः समीर जानवलकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
देवदत्त शिवाजी शेलार, विश्वास गुलाबराव शेलार, देवेंद्र भास्कर शेलार (देऊ), सरपंच सौ. दुर्वा शेलार, सदानंद गोपीनाथ शेलार (फौजदार), सर्व मानकरी, संजय लक्ष्मण शेलार, संजय काशिनाथ शेलार, विनय नारायण शेलार आणि भास्कर महादेव शेलार यांच्या सक्रिय सहभागामुळे या कामाला गती मिळाली. नदी पुनरुज्जीवनाच्या कार्यात ज्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला, त्या सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले.






