GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर दाभोळे येथे अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान, वर्षभर राबून हातातोंडाशी आलेले पीक वाया

Gramin Varta
182 Views

सिकंदर फरास/ दाभोळे ( संगमेश्वर) दाभोळे गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दाभोळे गावातील आजू बाजूच्या वाड्यांमधून सर्वे करण्यात आला.कापणीस आलेले भात पिक पावसामुळे आडवे पडून ओले झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानीचा तातडीने आढावा घेण्यासाठी कृषी अधिकारी चौगुले, तलाठी जमादार तसेच त्यांचे सहकारी दिलीप मालप यांनी शेतांची पाहणी करून पंचनामे केले. या वेळी सरपंच राजेश रेवाळे आणि ग्रामसेवक इंदुलकर, ग्रामसेवक सौरभ महाडिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, पंचनाम्यानुसार लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Total Visitor Counter

3366866
Share This Article