GRAMIN SEARCH BANNER

फेविकॉलचे ‘खुर्ची पे नजर’; खास, मिश्कील शैलीत भारतीय संस्कृतीतील कालातीत अंतर्दृष्टीचे दर्शन

Gramin Varta
3 Views

मुंबई : पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने आपली नवीन फेविकॉल टेलिव्हिजन जाहिरात, ‘कुर्सी पे नजर’ आज सादर केली. सूक्ष्म निरीक्षणाच्या आधारे निर्विवादपणे भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोनावर आधारित अशी ही जाहिरात आहे.

दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत ही जाहिरात एका साध्याशा खुर्चीचे बदललेले महत्त्व दर्शवते. एका सामान्य खुर्चीचा निव्वळ फर्निचर ते घरे, कार्यालये आणि संस्थांमधील महत्त्वाकांक्षा तसेच अधिकाराचे एक शक्तिशाली प्रतीक असा प्रवास, या जाहिरातीतून समोर येतो.

फेविकॉलची वैशिष्ट्यपूर्ण विनोदबुद्धी तसेच त्यांची आपुलकी यातून साकारलेली ‘कुर्सी पे नजर’ ही जाहिरात भारतीय समाजात खोलवर रुजलेले एक सत्य समोर आणते. जिथे खुर्चीच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षा, प्रभाव आणि प्रगतीच्या बदलत्या समीकरणांचे प्रतिबिंब मांडले आहे. ही जाहिरात या दैनंदिन निरीक्षणाला एका अविस्मरणीय कथानकात रूपांतरित करते आणि साध्या वाटणाऱ्या क्षणांमध्येही विलक्षण कथाकथन शोधण्याची फेविकॉलची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करतो.

ही मोहीम ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘कुर्सी पे नजर’ ही जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयूष पांडे यांनी तयार केलेली फेविकॉलची शेवटची मोहीम आहे. ही एक अशी सर्जनशील भागीदारी आहे, जिने अनेक दशकांपासून ब्रँडला एक विशिष्ट ओळख दिली आहे. फेविकॉलचा विनोद आणि त्यातील दृष्टिकोन भारताच्या स्मृतीत कोरली गेली आहे.

या मोहिमेच्या उद्घाटनावर भाष्य करताना, पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. सुधांशू वत्स म्हणाले, “फेविकॉल नेहमीच ग्राहकांच्या मनाला खोलवर भिडणाऱ्या, खुसखुशीत पद्धतीने सांगितलेल्या साध्या-साध्या मानवी भावनांच्या सादरीकरणासाठी ओळखला जातो. ‘कुर्सी पे नजर’ ही मोहीम एका खास भारतीय दृष्टिकोनातून प्रेरित आहे, जो कामाची जागा, घर आणि प्रत्येक संस्थेमध्ये दिसतो, जिथे ‘खुर्ची’ हे आकांक्षा, स्थित्यंतर आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. अशा दैनंदिन निरीक्षणांमधून फेविकॉलसाठी एक उत्तम कथानक तयार करण्याची विलक्षण क्षमता पीयूष पांडे यांच्यामध्ये होती. ही जाहिरात एका साध्या पण प्रभावी कल्पनेद्वारे तोच वारसा पुढे नेत आहे, जी निःसंशयपणे फेविकॉलची ओळख आहे.”

कॉर्कोइस फिल्म्सचे संचालक प्रसून पांडे पुढे म्हणाले, “आम्हा सर्वांसाठी ही आतापर्यंतची सर्वात कठीण जाहिरात होती. ही पीयूषची कल्पना होती-नेहमीप्रमाणेच अत्यंत वेगळी. आम्ही सर्वांनी त्याच्याशी याविषयी अत्यंत सविस्तर चर्चा केली होती; परंतु त्यानंतर अचानकच तो आम्हाला सोडून गेला. स्वतःला सावरण्यासाठी आणि पुन्हा स्थिर होण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा होता; म्हणूनच आम्ही ही जाहिरात पाच महिन्यांनंतर चित्रित करण्याचे ठरवले. ही कथा जीवनाचे अत्यंत सखोल निरीक्षण करणारी आहे, आणि ती फेविकॉलच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदशैलीत आणि साधेपणाने सादर करण्यात आली आहे.”

ओगिल्वी इंडियाचे ग्रुप सीसीओ, कायनाझ कर्मकार आणि हर्षद राजाध्यक्ष म्हणाले, “आमच्यासाठी ही केवळ एक जाहिरात कधीच असू शकत नाही. हा एक प्रवास होता-खरंतर ती एक तीर्थयात्राच होती-आणि ती अशा वाटेवरून घडली, जी पीयूषने केवळ ओगिल्वीसाठीच नव्हे, तर आमच्या संपूर्ण व्यवसायासाठी निर्माण केली होती. यामागील मूळ संकल्पना पीयूषनेच मांडली होती; आणि त्याची ती दृष्टी प्रत्यक्षात उतरवण्याचा जो दबाव होता, तसा अनुभव यापूर्वी आम्ही कधीच घेतला नव्हता, किंबहुना त्याची कल्पनाही कधी केली नव्हती.”

‘कुर्सी पे नजर’ ही जाहिरात फेविकॉलचा वास्तववादी कथाकथनाचा वारसा पुढे नेते, जिथे विनोद, निरीक्षण आणि सांस्कृतिक सत्य एकत्र येऊन एक साधासाच पण अत्यंत अविस्मरणीय संवाद तयार होतो. एका वैशिष्ट्यपूर्ण भारतीय वागण्याच्या दृष्टिकोनातून ही जाहिरात ब्रँडच्या घट्ट नातेसंबंधांच्या तत्त्वज्ञानाला अधिक दृढ करते.

Total Visitor Counter

3364989
Share This Article