GRAMIN SEARCH BANNER

खेड: जेईई बी.आर्च परीक्षेत रोटरी स्कूलची झेप; जिया मेहता देशात द्वितीय

Gramin Varta
26 Views

खेड : रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, जेईई बी.आर्च 2026 प्रवेश परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये कु. जिया मेहता हिने 99.97 पर्सेंटाईल गुण मिळवत जनरल-इडब्ल्यूएस गटातून देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे खेडसह संपूर्ण जिल्ह्यात शाळेचे कौतुक होत आहे.

देशभरातील नामांकित आर्किटेक्चर महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई बी.आर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करत शाळेची शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली. जिया मेहता हिच्यासह इशा कदम हिने 99.86 पर्सेंटाईल, आर्या गायकर हिने 98.55 पर्सेंटाईल, रिद्धी भागणे हिने 98.37 पर्सेंटाईल, अफरीन बेबल हिने 96.60 पर्सेंटाईल, विपुल मुळ्ये याने 95.55 पर्सेंटाईल, जान्हवी कदम हिने 94.23 पर्सेंटाईल, सानिका साळुंके हिने 90.72 पर्सेंटाईल, कस्तुरी देवघरकर हिने 81.90 पर्सेंटाईल तर मनस्वी दांडेकर हिने 81.06 पर्सेंटाईल गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले.

या यशामुळे रोटरी स्कूलचे विद्यार्थी एसपीए दिल्ली, एसपीए भोपाळ तसेच एनआयटीसारख्या देशातील अग्रगण्य आर्किटेक्चर महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामागे उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल यांच्यासह प्राध्यापक रोहन खेडेकर, मानसी देवघरकर, गुरुप्रसाद देवघरकर, शुभम जड्याळ, राजेश जाधव आणि अनिल सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3364218
Share This Article