GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण सेतू सुविधा केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त

Gramin Varta
32 Views

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी पालकांची हेलपाटे

चिपळूण : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाचीही प्रतीक्षा लागली असून विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विविध दाखल्यांची आवश्यकता भासत आहे. मात्र चिपळूण तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात वारंवार सॉफ्टवेअर बंद पडणे, तसेच “साईट ओपन होत नाही” अशी कारणे सांगितली जात असल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातून दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून वेळ आणि पैशांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी दोन दिवस साईट सुरू झाल्यानंतर पुन्हा सेवा बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी जात, उत्पन्न, रहिवासी आदी दाखले अत्यावश्यक असताना सेतू सुविधा केंद्रातील कामकाज ठप्प होत असल्याने पालक आणि विद्यार्थी कंटाळले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून तहसील कार्यालयात यावे लागत असून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर चिपळूण तहसीलदार प्रवीण लोकरे तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सेतू सुविधा केंद्रातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3366586
Share This Article