GRAMIN SEARCH BANNER

पेट्रोलने चूल पेटवताना आगीचा भडका; महिला भाजून गंभीर जखमी

Gramin Varta
222 Views

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे पेट्रोलच्या सहाय्याने चूल पेटवताना अचानक आगीचा भडका उडाल्याने एक महिला गंभीर भाजून जखमी झाली आहे. द्रौपदी चंद्रकांत पवार (वय ४२, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे जखमी महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रौपदी पवार ही चाफवली येथील जंगलमय भागात असलेल्या झोपडीत वास्तव्य करत होती. २८ डिसेंबर रोजी दुपारी चूल पेटवण्यासाठी पेट्रोल वापरत असताना अचानक आगीचा भडका उडाला. या आगीत तिच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला, त्यामुळे ती सुमारे ७० टक्के भाजली.
घटनेनंतर तिला तातडीने साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी तिला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3253760
Share This Article