GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण-कळंबट एस.टी. बस अपघात होऊन उतारावर पलटी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
254 Views

चिपळूण: तालुक्यातील गुढे मोरेवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोरील उतारावर चिपळूण ते कळंबट जाणारी एस.टी. बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. बस चालकाने गाडी बेदरकारपणे आणि वेगात चालवून रस्त्याबाहेर नेल्याने हा अपघात घडला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस चालक दिलीप मल्हारी नरगुंडे (वय ४५, बॅच नं. ४२५०१, रा. एस.टी. डेपो, चिपळूण) हे आपल्या ताब्यातील चिपळूण ते कळंबट एस.टी. बस (क्र. एम.एच. २० बी.एल. ३५९३) घेऊन जात होते. ही बस गुढे मोरेवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोरील तीव्र उतारावर आली असता, चालक नरगुंडे यांनी बसवरील नियंत्रण गमावले. बेदरकारपणे आणि वेगात असलेली ही बस थेट रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात एस.टी. बसचे मोठे नुकसान झाले असून चालक स्वतःही लहान-मोठ्या दुखापतींमुळे जखमी झाला आहे.

या अपघातप्रकरणी तक्रारदार संजय शंकर यादव (वय ५०, व्यवसाय- नोकरी, रा. शिरगाव मार्केट, चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ जून २०२६ रोजी दुपारी दोन वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बस चालक दिलीप नरगुंडे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ (पूर्वीचे आयपीसी २७९, ३३७, ३३८) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3451739
Share This Article