खेड: तालुक्यातील सोनगाव घागवाडी येथे अज्ञात चोरट्याने सुझुकी कंपनीची ‘हायाते’ मॉडेलची मोटारसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १४ जून रोजी रात्री ११ ते १५ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. १६ जून रोजी दुपारी २.३९ वाजता खेड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अरविंद घाग (वय २७, रा. सोनगाव घागवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची एम.एच. ०८ एके. ४१९८ क्रमांकाची लाल रंगाची सुझुकी हायाते ईपी (Hayate EP) मॉडेलची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची संमती नसताना, लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे. या चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे २०,००० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
खेडमध्ये अज्ञाताने दुचाकी लांबवली
