लांजा : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, का.रा कोळवणकर यामहा ट्रेनिंग स्कूलमध्ये नुकताच दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी कुमार शंकर गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जयवंत जाधव शिक्षक, पालक संघाचे उपाध्यक्ष पंढरी गुरव, सदस्य अमोल बोडस, शिक्षक पालक समितीच्या सदस्या सौ.बेंडल,बंडबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली, दिपप्रज्वलन शालेय समितीचे उपाध्यक्ष जयवंत जाधव तर प्रतिमेला पुष्पहार सौ.बंडबे यांनी अर्पण केले. शाळेचे मुख्याध्यापक माननीय अरुण डोळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे लेखणी देऊन व अतिथींना शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
दहावी बारावी मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी यांना प्रमाणपत्र व रोख रुपये देऊन अभिनंदन केले. यामध्ये प्रथम क्रमांक विद्यार्थिनी ईश्वरी संजय चव्हाण, द्वितीय क्रमांक विद्यार्थिनी कोमल संजय बेंडल आणि तृतीय क्रमांक विद्यार्थिनी चंदना संतोष डोळे व सर्व विषयांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
तसेच बारावी ए.टी मध्ये प्रथम येण्याचा मान कैस इस्माईल गडकरी, द्वितीय आदित्य चंद्रकांत कांबळे, तृतीय देवदत्त गुरव तसेच एम.एल.टी विभागांमध्ये प्रथम येणारी विद्यार्थीनी सानिका शिगम, द्वितीय तन्वी करंबळे व तृतीय साहिल पांचाळ आदीं विद्यार्थ्यांना पारितोषिक व रोख रुपये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर एन.एम.एम.एस परीक्षेला व शिष्यवृत्तीला पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन देऊन अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विनोद बंडगर व आभार प्रदीप लाड यांनी मानले.
लांजा: वेरवली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
