रत्नागिरी : शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘श्री रत्नागिरीचा राजा’ या मंडळाच्या गणपतीचे काल उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात आगमन झाले. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगमन सोहळा पार पडला.
या प्रसंगी हजारो गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष म्हणून दाखवलेल्या प्रेमासाठी आणि उस्फूर्त सहभागासाठी मनःपूर्वक आभार मानतो, असे उद्गार मा. ना. सामंत यांनी यावेळी काढले. त्यांनी सर्व गणेशभक्तांचे आभार मानत गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणपतीचे भव्य आगमन
