GRAMIN SEARCH BANNER

देवरूखमध्ये महिलेचा आकस्मिक मृत्यू

संगमेश्वर : ग्रामीण रुग्णालय देवरूख येथे सौ. प्रतीभा प्रदीप सावंत ( 58, रा. देवरूख, कांजीवरा, मैत्री पेट्रोलपंपाच्या मागे, ता. संगमेश्वर) या महिलेचा 26 जून रोजी सायंकाळी 7.20 वाजता आकस्मिक मृत्यू झाला.

वरील तारखेस व वेळी, सौ. शुभांगी घाग यांच्या घराच्या परिसरात नारळाच्या झाडाजवळ ती डाव्या कुशीवर पडलेली दिसली. तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यानंतर तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरूख येथे दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी 26 जून रोजी रात्री 10.06 वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3447335
Share This Article