रत्नागिरी : शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अव्दैत संदेश चवंडे (२२ वर्षे, रा. युनिटी ट्युलीप, फ्लॅट नं. ४०२, हॉटेल सिंधुदुर्ग शेजारी, साळवीस्टॉप, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई २६ जून २०२५ रोजी रात्री ८.२० वाजता माळनाका ते एस.टी. कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्यावर करण्यात आली.
या प्रकरणी गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अव्दैत संदेश चवंडे याला ब्राउन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ आणि दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये १,४४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. यामध्ये ४४,०००/- रुपये किमतीच्या एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीतील ८ ग्रॅम वजनाच्या ब्राउन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थाचा समावेश आहे, ज्यामध्ये ८८ पुड्यांचा समावेश असून प्रत्येक पुडीची किंमत ५००/- रुपये आहे. तसेच, १,००,०००/- रुपये किमतीची नारंगी आणि काळ्या रंगाची होंडा कंपनीची डिओ दुचाकी (एम.एच.०८/एझेड/४५२९) देखील जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.